नहूम
लेखक
नहूमच्या पुस्तकाच्या लेखकाने स्वतःला नहूम (इब्रीमध्ये “सल्लागार” किंवा “सांत्वन करणारा”)एल्कोशकर या नावाने ओळखले (1:1). एक संदेष्टा म्हणून, नहूमला अश्शूरच्या लोकांमध्ये पश्चाताप करण्याची, विशेषत: त्यांच्या राजधानीतील निनवे शहराला पाठवण्यासाठी बोलावले गेले होते. योनाच्या संदेशामुळे निनवेच्या लोकांनी पश्चात्ताप केला होता, पण 150 वर्षांनंतर ते त्यांच्या पूर्वीच्या मूर्तीपूजेकडे वळले होते.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 620-612.
नहूम खरोखर प्रत्यक्षात सहजतेने दिनांकित केले जाऊ शकते, कारण हे या दोन सुप्रसिद्ध ऐतिहासिक घटनांमध्ये स्पष्टपणे घडते: थीब्सचे पतन आणि निनवेचे पतन.
प्राप्तकर्ता
नहूमची भविष्यवाणी अश्शूरी लोकांना देण्यात आली होती ज्यांनी दहा उत्तरी जमातींना पकडले होते, पण यहूदाच्या दक्षिणेकडील राज्याला भीती घातली होती, ज्याला असेच वाटले की त्याच्याही बाबतीत हेच घडेल.
हेतू
देवाचा न्याय नेहमीच योग्य आणि नेहमीच निश्चित आहे. त्याने काही काळ दया करण्याची निवड केली पाहिजे काय, त्या चांगल्या देणगीला शेवटी सर्वांसाठी परमेश्वराच्या न्यायाची अंतिम समज प्राप्त होणार नाही. देवाने 150 वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या दुष्ट मार्गांनी पुढे चालत राहिल्यास काय होईल याबद्दलच्या त्याच्या वचनांसह योना संदेष्ट्याला आधीच त्यांच्याकडे पाठवले होते. त्या वेळेस लोकांनी पश्चात्ताप केला होता परंतु आता ते पूर्वीपेक्षाही वाईट न होता तेवढेच वाईट राहिले. अश्शूरी लोक त्यांच्या विजयात पूर्णपणे क्रूर झाले होते. आता नहूम यहूदाच्या लोकांना हताश न होता सांगत असे कारण देवाने न्यायदंड बजावला होता आणि लवकरच अश्शूरी लोकांना जे पाहिजे त्या गोष्टी मिळवतील.
विषय
सांत्वन
रूपरेषा
1. देवाची महिमा — 1:1-14
2. देवाचा न्याय आणि निनवे — 1:15-3:19
1
सूड घेणारा परमेश्वराचा क्रोध
1 निनवे शहराविषयीची घोषणा. एल्कोशी नहूम याच्या दृष्टांताचे पुस्तक.
2 परमेश्वर हा ईर्ष्यावान व सूड घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधयुक्त देव आहे. परमेश्वर आपल्या विरोध्यांचा बदला घेतो आणि तो आपल्या शत्रूंसाठी क्रोध राखून ठेवतो. 3 परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे; त्याच्या शत्रूंना तो निरापराध ठरवणार नाही. परमेश्वर झंझावातातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत.
4 तो समुद्राला दटावतो आणि त्यास कोरडा करतो; तो सर्व नद्या कोरड्या करतो. बाशान व कर्मेलसुद्धा गळून जातील; लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो. 5 त्याच्या उपस्थितीने पर्वत हलतात आणि टेकड्या वितळून जातात; त्याच्या उपस्थितीने पृथ्वी कोसळते, खरोखर हे जग आणि त्यामध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य थरथरतो.
6 त्याच्या क्रोधापुढे कोण उभा राहू शकेल? त्याच्या क्रोधाच्या संतापाचा कोण प्रतिकार करू शकेल? त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे ओतलेला आहे आणि त्याच्यामुळे खडक फुटून जातात.
7 परमेश्वर चांगला आहे, संकटसमयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो. 8 पण तो त्याच्या शत्रूंचा* निनवे पूर्णपणे महापुराने नाश करील; तो त्यांचा पाठलाग करून अंधारात उधळून लावील.
9 तुम्ही लोक परमेश्वराविरुध्द काय योजना करत आहात? पण तो त्याचा पूर्ण अंत करील; दुसऱ्यांदा विपत्ती उठणारच नाही. 10 ते गुंतागुंत झालेल्या काटेरी झुडपाप्रमाणे, आपल्या स्वत:च्या पिण्याने मस्त झालेले असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील. 11 जो परमेश्वराविरुध्द वाईट योजना करतो, दुष्कर्माला बढती देतो असा कोणी एक निनवेतून निघाला आहे.
12 परमेश्वराने जे काय म्हटले ते हेः जसे परमेश्वराने म्हटले, जरी ते त्यांच्या संपूर्ण बलाने आणि संख्येने पुष्कळ असले तरीसुद्धा ते छेदले जाऊन त्यांचे लोक नाहीसे होतील. परंतु तू यहूदा, जसे परमेश्वराने म्हटले; जरी मी तुला पीडले आहे तरी पुढे मी तुला पीडणार नाही. 13 तर आता मी त्यांचे जोखड तुझ्यावरून मोडून काढीन व तुझी बंधने तोडून टाकीन.
14 आणि परमेश्वराने तुझ्याबद्दल आज्ञा दिली आहे की, निनवे, तुझे नाव धारण करणारे तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. मी तुझ्या देवाच्या मंदिरातील कोरलेल्या मूर्ती व ओतीव मूर्ती छेदून टाकीन. मी तुझी कबर खोदून काढील, कारण तू दुष्ट आहेस.
निनवेच्या पतनाचे वर्तमान
15 पाहा, जो सुवार्ता आणतो, शांती जाहीर करतो! असा जो त्याचे पाय पर्वतांवर आहेत, यहूदा आपले सण साजरे कर, आपले नवस फेड, दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.