2
यहेज्केलाला पाचारण
1 ती वाणी मला म्हणाली; “मानवाच्या मुला* नाशवंत मनुष्या, आपल्या पायांवर उभा राहा; मग मी तुझ्याशी बोलेन.” 2 जेव्हा ती वाणी माझ्याशी बोलली तेव्हा देवाच्या आत्म्याने मला माझ्या पायावर उभे केले आणि मी त्यास माझ्याशी बोलताना ऐकले. 3 इस्राएलाच्या लोकांजवळ मानवाच्या मुला, मी तुला पाठवत आहे ती वाणी मला म्हणाली. बंडखोर देशाजवळ ज्या राष्ट्रांनी माझ्याशी बंड केले, पहिल्यापासून त्यांनी आणि त्यांच्या पुर्वीच्या पिढ्यांनी माझ्या विरुध्द पाप केले आहे. 4 त्यांच्या पूर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत आहे. असे त्यांना तू सांग. 5 ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही, ते फितुर झालेले आहेत. परंतू संदेष्टा त्यांच्याकडे आला होता असे त्यांना कदाचित कळून येईल. 6 त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत. 7 पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत. 8 परंतू मी जे तुला मानवाच्या मुला बोलायला सांगत आहे ते ऐक त्या फितुर जातीच्या लोकांसारखे फितुर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा! 9 माझ्याकडे एक हात येत आहे असे मी पाहिले; आणि पाहा, पुस्तकाची एक गुंडाळी त्यामध्ये होती. 10 तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहिलेला होता.